भारतात क्रिकेटला धर्म आणि सचिनला देव मानलं जातं.. आणि या भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकणारा महान खेळाडू म्हणजे कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी. माहीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचली आणि सोबतच तो स्वतःही. आपल्या शांत आणि संयमी खेळीने प्रतिस्पर्धी संघावर जरब ठेवणार्या धोनीचा आतापर्यंतच हा संपूर्ण जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर पडद्यावर येतोय "धोनी - द अनटोल्ड स्टोरी" या सिनेमाच्या माध्यमातून...
नीरज पांडे दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ३०सप्टेंबरला रिलीज होतोय. यामध्ये आपल्याला धोनीच्या आयुष्यातले लोकांना माहीत नसलेले अनेक प्रसंग पहायला मिळणार आहेत. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये धोनी आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांची लव्हस्टोरी आहे, तर तुम्ही चुकताय... कारण माहीच्या आयुष्यात साक्षीच्या येण्या आधीही प्रियांका झा नावाची मुलगी होती. ती होती धोनीचं पहिलं प्रेम. या चित्रपटात याच दोघांच्या लवस्टोरीेवर फोकस करण्यात आलाय. दोघांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. पण त्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य बिझी झाला आणि एका अॅक्सीडेंट मध्ये प्रियांकाचा मृत्यू झाला. धोनी या धक्क्यामुळे प्रचंड खचला होता. धोनीची ही सिक्रेट लवस्टोरी पाहाणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या चित्रपटात विराट कोहलीची भुमिका केलीय ती पाकिस्तानी कलाकार फवाद खान याने !!
चित्रपटात धोनीच्या भुमिकेत सुशांत सिंग रजपूत दिसेल. लोकांना धोनीची खेळी आणि प्रसिद्धी दोन्हीही परिचित आहेत. आता या बायोपिकमधून धोनीचा संघर्ष आणि जिद्द पहायला मिळणार आहे...
