2G इंटरनेट वापरताय ? गुगलने केलीय तुमच्यावर कृपादृष्टी ! 

लिस्टिकल
2G इंटरनेट वापरताय ? गुगलने केलीय तुमच्यावर कृपादृष्टी ! 

जगभरात सद्या 5G इंटरनेटचे वारे वाहत आहेत. पण भारतात मात्र अजूनही बरेच लोक 2G आणि 3G इंटरनेटचाच वापर करतात. पण 2G इंटरनेटवर तुम्हाला हवं तसं इंटरनेट स्पीड मिळत नाही आणि ना आपल्याला अॅप्स डाऊनलोड करता येतात ना विडीओ पाहता येतात. 

  पण आता भारतातल्या  2G इंटरनेट युजर्ससाठी गुगल काही नवीन सुविधा सादर करत आहे. आणि त्यामुळे आपल्याला आता 2G च्या स्पीड मध्ये इंटरनेटचा खरा आनंद लुटता येईल. दिल्ली मध्ये झालेल्या 'गुगल फॉर इंडिया' या कार्यक्रमात गुगलने ही घोषणा केलीय

 यु-ट्युब गो अॅप 

यु-ट्युब गो अॅप 

या अॅपची खासीयत ही आहे की ज्या ठिकाणी इंटरनेट स्पीड मंद आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही युट्यूब चे विडीओ डाऊनलोड करू शकता. तेही अत्यंत कमी डाटा खर्च करून. सोबतच यावर तुम्ही अॉनलाईन विडीओसुद्धा विना बफरिंग पाहू शकता आणि ते वाय-फाय डायरेक्ट द्वारे शेअर सुद्धा करू शकता. 

क्रोमपसाठी ऑफलाईन फिचर

क्रोमपसाठी ऑफलाईन फिचर

गुगलने क्रोम ब्राउजर मधील वेब पेज साठी काम करणारा  अॅटोमॅटीक आॅप्टीमायझींग फिचर कमी केला आहे. त्यामुळे क्रोम मध्ये आता आधीपेक्षा दुप्पट स्पीडने पेज लोड होईल आणि आपल्या 90% डेटाची बचतपण होईल. 

2G नेटवर्क वर चालणार प्ले स्टोअर

2G नेटवर्क वर चालणार प्ले स्टोअर

गुगलच्या म्हणण्यानुसार आता आपण 2G नेटवर्कवर सुद्धा प्ले स्टोअर वरून कमी डेटा वापरून वेगाने अॅप्स डाऊनलोड करू शकतो. 

गुगल स्टेशन

गुगल स्टेशन

गुगल भारतात आपली 'गुगल स्टेशन' ही सेवा सुरू करत आहे. यानुसार रेल्वे स्टेशन, मॉल्स, विद्यापीठ, बस स्टॉप अशा ठिकाणी आपल्याला मोफत वाय-फाय सुविधा मिळणार आहे. 

गुगलने नुकतंच १८व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तेव्हा गुगलला हॅप्पी बर्थडे आणि हो.. आमची इतकी सेवा करण्यासाठी मनापासून थँक्स...⁠⁠⁠⁠