या वर्षीचा बहु प्रतिक्षित आणि वादग्रस्त सिनेमा म्हणजे पद्मावती. मंडळी, घटस्थापनेच्या निमित्ताने पद्मावती सिनेमातील दीपिकाचा लुक रिलीज झाला होता. त्यानंतर शाहीद आणि रणवीरचा लुक रिलीज करण्यात आला. आणि आता थेट पद्मावतीचा ट्रेलर आला आहे बॉस...
भाऊ, ट्रेलर बघून तरी फिल्म एकदम खतरनाक असेल असं वाटतंय. रणवीरचा लुक अप्रतिम, दीपिका पद्मावतीच्या रोल मध्ये फिट, शाहीद सुद्धा एकदम तगडा दिसतोय. भन्साळी मिक्स असलेला युद्ध, ट्रॅजेडी आणि भव्यता असा मसाला इथे सुद्धा दिसून येतोय. सिनेमाकडून आशा बाळगायला हरकत नाही.
राव, आणखी काही ऐकण्यापेक्षा तुम्हीच बघा ना ट्रेलर.. आणि कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा !!!




