सगळ्यात अतरंगी कपडे घालणारा माणूस कोण, याचं उत्तर द्यायला तुम्हांला एक सेकंदही लागणार नाही. तो मान एकाच माणसाकडे जातो- रणवीर सिंग!! तो कुठल्या वादात शक्यतो अडकत नसला तरी भाऊवर नेहमी टीका होत असते. मध्यंतरी एका कार्यक्रमात फॅन्सच्या अंगावर उडी मारल्याने रणवीरने आता हे बालिश चाळे सोडावेत अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या होत्या. मंडळी, असे म्हणतात की लग्न झाल्यावर माणुस सुधारतो. पण रणवीरभाऊ लग्न झाल्यानंतर जास्तच धुमाकूळ घालत आहे. वेळोवेळी त्याच्या कपड्यांवरून बनलेले मिम्ससुद्धा वायरल होत असतात. मंडळी रणवीर एका इंटररव्ह्यूत म्हणाला होता, "जगाला फाट्यावर मारून आपल्याला जे योग्य वाटते तेच करायचे." पण हा आगाऊपणा आता त्याला महागात पडण्याची शक्यता आहे. यावेळी त्याने मोठा पंगा घेतला आहे राव!! तो पण साध्या सुध्या माणसासोबत नाही, तर चक्क जॉन सेना सारख्या रेसलरला रक्तबंबाळ करणाऱ्या आणि सध्या डब्ल्यूडब्ल्यूई फॅन्सच्या गळ्यातला ताईत असलेल्या "ब्रॉक लेसनर"सोबत!!
आता काय रणवीरची खैर नाही राव!! ब्रॉक लेसनरसारख्या पहाडाशी पंगा घेतला म्हणजे रणवीरला किती महागात पडेल हे सांगण्याची गरज नाही. पण तुम्ही म्हणाल रणवीरने असे काय केले की चक्क ब्रॉक लेसनर रणवीरच्या मागे लागला? तर मंडळी, वाचा हे सविस्तर प्रकरण..






