आज जागतिक संगीत दिन . धर्म-वंश-प्रांत-राज्य-राष्ट्र अशी कुठलीच मर्यादा नसलेली, एकच एकक असलेली वैश्विक भाषा म्हणजे संगीत. हृदयाची भाषा. प्रेमाची भाषा . जो ही भाषा (गो) बोलतो तो खरा ग्लोबल सिटीझन होतो.
पास्कल हेनी हे त्याचे उत्तम उदाहरण. पास्कल हा फ्रांसचा नागरीक आणि नावाजलेला गायक नट . कौलालंपूरच्या गजबजलेल्या बाजारात फिरताना त्याला काही हिन्दी आणि तमिळ गाण्यांच्या सीडीज मिळाल्या. ती गाणी ऐकल्यावर तो अगदी ‘नाद खुळा’ झाला आणि त्याने हिन्दी आणि तमिळ गाणी गायला सुरुवात केली. जुन्या हिन्दी फ़िल्मी गाण्याचे प्रेम त्याला मुंबईत घेऊन आले. मुंबईतून तो चेन्नईला गेला आणि इलया्राजाची गाणी गायला लागला.
ऐकूया पास्कल हेनीचे 'चली चली रे पतंग मेरी चली रे'...
