राधिका आपटेचा पार्च्ड आता ऑस्कर लायब्ररीत !!

राधिका आपटेचा पार्च्ड आता ऑस्कर लायब्ररीत !!

राधिका आपटे नेहमीच वेगवेगळ्या प्रयोगांसाठी चर्चेत असतेच, तिचा पार्च्ड नावाचा चित्रपट २०१५मध्येच जगभर प्रदर्शित झाला होता आणि त्यांने वेगवेगळे आवर्ड्स पण मिळवले आहेत. भारतात मात्र हा चित्रपट सेन्सॉर च्या कात्रीत अडकला. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे एक ट्रेलर रिलीज करण्यात आलं आहे. ट्रेलर सिनेमाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढवतो आहे. राधिक आपटे ही गुणी अभिनेत्री आहेच आणि त्याचसोबत अशा चांगल्या विषयावरच्या सिनेमात तिला पाहाणं हा नक्कीच चांगला अनुभव असेल. 

या सिनेमाबद्दल आज अजून एक चांगली बातमी आली आहे. या सिनेमाचा समावेश मार्गारेट हॅरिक लायब्ररी ऑफ मोशन पिक्चर्स आर्टस् आणि सायन्सेस म्हणजेच ऑस्कर लायब्ररीत करण्यात आलेला आहे. हि पहिलीच वेळ आहे जेव्हा भारतातील एक मुख्यधारेतील नसलेला म्हणजेच पॅरलल सिनेमा निवडण्यात आला आहे.

सिनेमा या क्षेत्राची कला आणि एक उद्योग म्हणून पुढे वाटचाल व्हावी या साठी सामान्य जनतेसाठी एक रेफरन्स लायब्ररी म्हणून ऑस्कर लायब्ररी नावाजली आहे. सिनेक्षेत्राचे अभ्यासक याचा वापर वर्षभर करत असतात.