रवी जाधवांचा न्यूड

रवी जाधवांचा न्यूड

नटरंग, बालगंधर्व, बालक पालक, टाईमपास १ & २ सारखे एका पेक्षा एक उत्तम कलाकृती घडवणारा दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. त्याचा पुढचा सिनेमा कोणता असणार याची चर्चा सर्वत्र होती. या वेळी त्याने जरा हटके विषय निवडला आहे हे तुम्हाला चित्रपटाच्या नावावरूनच कळेल. चित्रपटाचे नाव आहे ‘न्यूड’. या आगामी सिनेमात कोणते कलाकार असणार ते अद्याप गुलदस्त्यात आहे. सोशल मिडियावर रवी जाधवने स्वतः आपल्या या नवीन सिनेमाचे पोस्टर रिलीज करून सिनेमाची घोषणा केली आहे. नावावरून तरी काही वेगळा विषय पाहायला मिळणार याची जाणीव होते.

त्याच बरोबर ‘बॅंन्जो’ सिनेमातून रवी जाधव हिंदीतही आपली कमाल दाखवायला तयार असल्याच कळतंय. हे दोन्ही सिनेमे पुढच्या वर्षभरात रिलीज होतील. यासाठी आपल्याला तूर्तास तरी वाट बघावी लागेल.

टॅग्स:

marathi movie

संबंधित लेख