९० च्या दशकात अनेक बॉलिवूड व्हिलन अजरामर झाले. अभिनेत्यांनी केलेली पात्रे त्यांच्या खऱ्या नावांपेक्षा जास्त प्रसिद्ध आहेत. कर्नल चिकारा म्हणजेच रामी रेड्डी हे पण असेच प्रसिद्ध व्हिलन!!! त्यांचा चेहरा बघूनच कोणी पण घाबरून जाईल असा हा भयंकर व्हिलन. डोळे, आवाज, एक्सप्रेशन प्रत्येक अंगाने फुल टू व्हिलन मटेरिअल असलेला हा अभिनेता, देशभर स्पॉटनाना या नावाने पण प्रसिध्द आहे.
देशात आजही एखादा टक्कल पडलेला मनुष्य जर तापट स्वभावाचा असेल तर त्याला स्पॉटनाना म्हणून बोलले जाते. इतके गारुड या स्पॉटनाना उर्फ रामी रेड्डी यांचे आहे. व्हिलन असूनही इतके प्रसिद्ध होणे सर्वांच्या नशिबी नसते. तरी देखील याच रामी रेड्डी यांचा शेवट मात्र वाईट झाला. २५० पेक्षा जास्त सिनेमे केलेल्या रामी रेड्डी यांना लिव्हरच्या आजारामुळे त्यांना सिनेमे सोडावे लागले होते.



