पुर्वीची पॉर्नस्टार सनी लियोन बॉलीवूडमध्ये एंट्री केल्यापासून भलतीच लाजाळू झालीय. कधी तिला बेड सिन्स देताना लाज वाटते तर कधी किसींग सिन्स देताना. आता हेच बघा ना...
"भाभीजी घर पर हैं" ही फेमस टिव्ही सिरीयल तर तुम्हाला माहित असेलच. आणि त्यातली ती उठसूठ "सही पकडे हैं" म्हणणारी अंगूरीभाभी पण आता लोकांच्या ओळखीची झालीय. तर आपल्या या सनी मॅडम आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी या सिरीयलमध्ये एका एपिसोडसाठी सामिल झाल्या. साहजिक शूटींग मध्ये तिला "सही पकडे है" हा डायलॉग म्हणायला सांगितला गेला. पण सनीने चक्क हा डायलॉग म्हणायला नकारच देऊन टाकला. आपण हे म्हटलं तर प्रेक्षक त्याचा वेगळा अर्थ काढतील असा तर्क सनीने बांधला..
चांगलं तासभर शूटींग रखडून सर्वांनी सनीला समजावलं की हा डायलॉग सिरीयलचा अविभाज्य भाग आहे. यासाठी तीच्या पतीला विशेष परिश्रम घ्यावे लागले. आणि शेवटी ती हा डायलॉग म्हणायला तयार झाली..
