२०१२मध्ये अण्णांचे आंदोलन फुल्ल फार्मात असताना ’मैं अण्णा हूं’ च्या टोप्या घालून फिरणार्यांत तुम्ही होतात का? मग तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ’किसन बाबुराव हजारे’ म्हणजेच आपले अण्णा हजारे यांचा एका सामान्य सैनिक ते समाजसेवक ते राष्ट्रीय स्तरावरचे आंदोलक असा प्रवास एका चित्रपटाद्वारे आपल्या समोर येणार आहे.
या चित्रपटाचे नाव अर्थातच अण्णा आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अण्णांची भूमिका शशांक उदापूरकार यांनी केली आहे. हा चित्रपट यावर्षी १४ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
