६ नोव्हेंबर २०१७. सलमानचे चाहते ज्या गोष्टीची आतुरतेने वात बघत होते तो दिवस आला. “टाइगर जिंंदा है” चा ट्रेलर आलाय भाऊ. ट्रेलर वरून तर वाटतंय की निर्मात्यांनी बक्कळ पैसा खर्च केलाय राव. आता आमची एवढीच अपेक्षा आहे की थोडं फार खर्च कथेवर सुद्धा केला असावा. सल्लूच्या फिल्म्स काढून अश्या अपेक्षा ठेवायच्या नसतात. असो...
तर मंडळी, या ट्रेलर मध्ये काय आहे ? एक आतंकवादी ज्याने इराक वगैरे भागात भारतीय नर्सेस ना किडनॅप केलंय, त्याच्या पाठी पडलेली ‘ग्यारह मुलखो की आर्मी’ आहे, आता या सैनिकांनी जर त्या आतंकवादीला पकडलं तर कथा पुढे कशी जाणार म्हणून मग ‘टायगर’ ला बोलवा म्हणजेच सलमान भाईला. असं म्हटलं जातंय की 'एक था टायगर' च्या कथानकाच्या पीढील भाग यात बघायला मिळणार आहे.

स्रोत
सलमानच्या नेहमीच्या चित्रपटांप्रमाणेच यात अॅक्शन आहे, ड्रामा आहे, रोमान्स आहे, फक्कड डायलॉगबाजी आहे, कॅॅटरीना मख्ख चेहऱ्याने अभिनय करण्याचा प्रयत्न करते, सल्लू तर आपला टायगर म्हणून फिट दिसतोय. यात बदल आहे तो दिग्दर्शकाचा. ‘एक था टायगर’ दिग्दर्शित केला होता 'कबीर खान'ने आणि हा सिनेमा दिग्दर्शित केलाय ‘अली अब्बास झफर’ याने. बाकी याही भागात गिरीश कर्नाड यांना बघून बरं वाटतं. (म्हणजे कोणीतरी आहे ‘अभिनय’ करणारा.)
बॉस, सल्लूचे फॅन असाल तर हा ट्रेलर तुमच्या अंगावर काटा वगैरे आणेल हा आणि जर फॅन नसाल तर तुम्हाला काही नवीन दिसेल असं वाटत नाही...
