आपण सगळेच आपल्या तब्येतीबद्दल जास्त जागरूक झालो आहोत. निरनिराळ्या आजारांपासून बचावासाठी तुम्ही नियमित व्यायाम, योग, चालणे, जिम वैगेरे करतच असाल. खाण्यापिण्याबद्दल पण सकस-पौष्टिक आहाराकडे आपला कल असतोच. पण असे बरेच आजार आहेत जे वयोमानानुसार होत असतात. अर्थात घाबरून जायचं कारण नाही, कारणा आपण जागरुक असू तर बऱ्याच गोष्टी आधीच कळून पुढचे धोके टाळता येतात. आज जाणून घेऊयात पार्किन्सन म्हणजे कंपवाताबद्दल.
पार्किन्सन असे नाव का पडले असावे? याबद्दल जिज्ञासा असेलच ना?









