कोरोनाचे रुग्ण देशभर कमी होत आहेत. लसीकरणाचा टक्काही सुधारत आहे. या कारणांनी देशवासियांना दिलासा मिळत आहे. पण डेंग्यूचा देशभर वाढत असलेला प्रसार बघून अनेकांना चिंता होत आहे. गेल्या काही वर्षात डेंग्यू हा आजार आटोक्यात आलेला दिसत होता. पण आता कधी नव्हे इतक्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहे. त्यातही चिंताजनक बाब म्हणजे यात असलेला डेंग्यूचा नविन व्हेरिएंट!!!
तज्ञांच्या मतानुसार डेंग्यूचा नविन व्हेरिएंट देशातील ११ राज्यांत दिसून आला आहे. यामुळेच डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. यात डेंग्यू झाल्यावर अनेकांना येणारी शंका म्हणजे आपल्याला कोरोना तर नसेल? यामुळे चिंतेत अधिकच भर पडते. या ११ राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, उत्तरप्रदेश, ओडिसा यांचा समावेश आहे.




