लहानपणी जेव्हा आपल्याला बियर, व्होडका, व्हिस्की, रम इत्यादी पेय (चाखून) माहित नव्हती. त्यावेळी आपल्यासाठी ड्रिंक म्हणजे रसना, फ्रुटी हेच होते. उन्हाळ्यात घश्यात थंड जावं म्हणून रसना, एनर्जी यावी म्हणून ग्लूकाँडी, वर्षभर कधीही अमरस खाता यावा म्हणून फ्रुटी. काय मज्जा होती राव. पण घरच्यांना हे कसं आवडणार. मग आपण खाऊचे पैसे वाचवून आपल्या ‘ड्रिंक’ची सोय करायचो. तरी हॉरलिक्स, बुस्ट सारखे पेय मिळवण्यासाठी आपल्याला मोठ्यांकडेच जावं लागायचं.
आज आपण याच आठवणींना जागवणार आहोत. चला तर आज बघुयात आपल्या लहानपणीचे ११ आवडते ड्रिंक्स :












