इंस्टाग्रामवरील फोटो आणि रिल्स कितीही ट्रोल होत असले तरी इथे काही हुन्नरी आणि हुशार लोक आहेत. जे बघून त्यांच्या टॅलेंटला सलाम केल्याशिवाय माणुस राहू शकत नाही. एस्ट्रो फोटोग्राफर अँड्रु मॅकार्थी यांनी इन्स्टावर त्यांनी काढलेले सूर्याचे अफलातून फोटो शेअर केले आहेत. ही फोटोंची सिरीज बघितली तर कुणीही सूर्याचे हे फोटो बघून खुश होईल.
याआधी सूर्याचे काही मोजके उपलब्ध फोटो होते. त्यात केवळ सूर्याच्या पृष्ठभागावरील काळे डाग आणि आगीच्या ज्वाळा दिसत. यावर अँड्रुचे म्हणणे आहे की त्यांनी काढलेला फोटो हा आजवरचा सूर्याचा सर्वाधिक स्पष्ट फोटो आहे. हा फोटो काही त्यांनी एक क्लिक केला आणि समोर आला असे झालेले नाही.
तब्बल १,५०,००० फोटो काढल्यावर हा फोटो तयार झाला आहे. हे फोटो त्यांनी टेलिस्कोपमधून काढले आहेत. हे सर्व फोटो काढून झाल्यावर त्यांनी सर्व फोटो एकत्र केले आणि जे समोर आले ते निव्वळ अद्भुत आहे. याच्या सर्वात क्लोजअप व्ह्यूमध्ये आजवर एक रहस्य मानली गेलेली सूर्यावरची कृष्णविवरेही स्पष्ट दिसतात.
मॅकार्थी यांनी हा फोटो मोडीफाईड सोलर टेलिस्कोपच्या मदतीने हा फोटो काढला आहे. त्यांनी लोकांना आवाहन देखील केले की लोकांनी सामान्य टेलिस्कोपने सूर्य पाहू नये. त्यांनी सूर्याचा हा ओरिजिनल फोटो घेण्यासाठी ३०० मेगापिक्सल कॅमेरा वापरला आहे.
अँड्र्यूंचं इन्स्टाग्राम हँडल आहे cosmic_background. इथं भेट दिल्यास तुम्हांला आकाशगंगा आणि सूर्यमालेचे एकाहून एक सरस फोटोज दिसतील. सध्या त्यांचे ४,६८,००० फॉलोअर्स आहेत आणि या नव्या सूर्याच्या फोटोमुळे ही संख्या आणखीच वाढत आहे.
उदय पाटील
