मिथिलेश कुमार श्रीवास्तव हे नाव कधी ऐकलंय का हो भाऊ? नाही? मंडळी हा माणूस ‘मिस्टर नटवरलाल’ नावाने ओळखला जायचा. अमिताभ बच्चन यांच्या मिस्टर नटवरलाल या सिनेमा मागची प्रेरणा याच माणसापासून मिळाली. आता हा मिस्टर नटवरलाल हा एखादी व्यक्ती नसून ठगाचा चेहरा बनला आहे. दुसऱ्यांना फसवून पैसा कमावणारे, लुबाडणारे, तद्दन ‘४२०’ लोक असे सगळेच या कॅटेगरीत आले. मंडळी नटवरलाल इतका करामती होता की त्याने चक्क ताजमहाल तीनदा विकला होता, आहात कुठं !!
मंडळी, हा नटवरलाल नेमका होता तरी कोण आणि त्याने असे काय केले, की त्याची आजही आठवण काढली जाते. चला तर बघूयात नटवरलालबद्दल माहित नसलेल्या या ८ गोष्टी.













