मुकेश अंबानींचे भाषण एअरटेल आयडियाला पडले ११,९८३कोटींना

मुकेश अंबानींचे भाषण एअरटेल  आयडियाला पडले ११,९८३कोटींना

मोबाईल इंटरनेटच्या मार्केटमध्ये  रिलायन्स जिओनं कालपासून सगळीकडं धूम माजवलीय.  काल आलेले इंटरनेट दरांचे तक्ते बघता अंबानी खरोखर जगातलं सर्वात स्वस्त 4G देणार असं दिसतंय खरं. 
 

सध्याच्या ऑफरनुसार देशभरात काही सिलेक्टेड 4G स्मार्टफोन असणार्‍यांना रिलायन्स जिओ सिम मोफत दिलं जात आहे. सोबत 3 महिन्यांसाठी फ्री वॉईस आणि विडीओ कॉल्स, मोफत एसएमएस, फ्री अनलिमिटेड 4G डाटा पण  दिला जातोय. 3 महिन्यानंतरही कॉल्स आणि एसएमएस लाईफटाईम फ्री राहतील. आणि १ जीबी 4G डाटाचा दर असेल फक्त ५० रुपये ! सोबत जिओने सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन आणि राउटरही बाजारात आणलाय. म्हणजे इंटरनेटवर पडीक असणारे आता आणखी  स्वस्त दरात तिकडे जास्तच पडीक राहणार!!

पण या अंबानींच्या ऑफरमुळं काय झालं माहित आहे? अंबानींचं रिलायन्स जिओबद्दलचं भाषण चालू असतानाच  बघता-बघता एअरटेल आणि आयडिया सारख्या बड्या कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये धडाधड कोसळले हो!! आणि त्यांची मार्केटमधलं बाजारमूल्य ११,९८३ कोटींनीं गडगडलं.

           सध्यातरी हे सिमकार्ड  मिळवण्यासाठी ठिकठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. रिलायन्सने  काही मुख्य १४ मोबाईल कंपन्यांशी करार केलाय. या करारानुसार  तुम्ही नवा 4G स्मार्टफोन खरेदी केला किंवा तुमच्याकडे तो आधीच असेल तर तुम्हाला हे सिम मोफत मिळू शकते. तुमचा 4G स्मार्टफोन सॅमसंग, सोनी, पॅनासोनिक, LYF, अॅसुस, मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन, जिओनी, TCL, झोलो यापैकी एका कंपनीचा असेल तर रिलायन्स स्टोअरला नक्की भेट द्या..