पाणीपुरी खा आणि पेटीएम करा : भेटा स्मार्ट बिहारी भैय्याला

पाणीपुरी खा आणि पेटीएम करा : भेटा स्मार्ट बिहारी भैय्याला

पुढारलेल्या विज्ञान तंत्रज्ञानाने आज आपलं जीवन कीती सुखकर बनवलंय हे काही वेगळं सांगायला नको. पेटीएम नावाचा ई-वॉलेट वापरून आपण वीज बील, मोबाईल रिचार्ज घरबसल्या करू शकतो हे तर तुम्हाला माहितच आहे. आता याच पेटीएमचा वापर चक्क एका पाणीपुरीवाल्याने सुरू केलाय... 


हा पाणीपुरीवाला दादा आहे बिहारचा. बिहारमधल्या मगध वुमन्स कॉलेजच्या बाहेर सत्यम पाणीपुरी विकतो. आता वुमन्स कॉलेजच का? असा प्रश्न विचारू नका कारण मुलींना पाणीपुरी किती आवडते याची कल्पना बहुतेक जणांना असेलच.  असो. तर या सत्यमकडे पाणीपुरी खायला येणाऱ्या मुली सोबत फक्त मोबाईल घेऊन येतात, पाणीपुरी खातात, आणि पैसे सत्यमला पेटीएमवर पाठवतात! छान आहे ना आयडिया? सत्यम सांगतो की पेटीएम वापरल्यामुळे सुटया पैशांचा प्राॅब्लेम तर नसतोच  आणि कॅश बाळगण्याची गरच पण संपते. आणि तसंही या सगळ्या मुलींना पेमेंटचा हा प्रकार भलताच आवडलाय..

१२वी पास असलेला सत्यम सद्या ग्रॅज्युएशनची तयारी करतोय. पेटीएमची ही भन्नाट कल्पना तिकडे आता आणखी काही पाणीपुरीवाल्यांना आवडली आहे. लवकरच हे दृष्य कदाचित सर्वत्र दिसेल. पण असल्या स्मार्ट आयडिया आपल्याकडच्या वडापाववाल्यांना का नाही सुचत कोणास ठाऊक?