बर्याच वेळा तुमच्या मित्रमंडळीतून किंवा नातेवाईकांकडून एक मेसेज येतो, आज रात्री आमच्याकडे ब्रह्मकमळ फुलणार आहे. एकदा फुलले की काही तासांतच ते कोमेजते. तेव्हा वेळेत या. दर्शन घ्या आणि पूजेतही सहभागी व्हा! याआधी हा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. पण सध्याच्या सामाजिक दुराव्याच्या काळात ते शक्य होत नाही. म्हणून दुसर्या दिवशी फेसबुकवर ब्रह्मकमळाचे सुंदर फोटो बघायला मिळतात.
पण आम्ही आज ज्या ब्रह्मकमळाबद्दल बोलणार आहोत ते आहे खरे 'ब्रह्मकमळ'. हे कमळ फक्त हिमालयात अतिउंच भागात म्हणजे जे ३००० ते ५७०० मीटर उंचीवर उगवते.





