काही वर्षांपूर्वी हरवलेले भाऊ किंवा इतर जिवलग एकमेकांना भेटले अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. सलमान खानच्या भारत सिनेमात देखील कित्येक वर्षांनी लोकांची त्यांच्या कुटुंबियांची कशी भेट झाली हे दाखवले आहे. एकवेळ माणसे परत सापडतील, पण लोकलमध्ये चोरीला गेलेले किंवा हरवलेले सामान परत मिळणार नाही असे समजले जाते.
पण मुंबईत मात्र हा चमत्कार घडला आहे. चक्क चौदा वर्षांनंतर एकाला त्याचे हरवलेले पकिट परत मिळाले आहे. गोष्ट २००६ ची!! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये हेमंत पेडळकर यांचे पैशांचे पाकिट हरवले होते. त्यावेळी त्यात ९०० रुपये होते. साहजिकच आता त्यांना कदाचित त्यांना या घटनेचा विसर पडला असावा.






