शेपट्या दोन पण बिबट्या एकच? या व्हायरल फोटोत किती बिबट्या दिसत आहेत?

शेपट्या दोन पण बिबट्या एकच? या व्हायरल फोटोत किती बिबट्या दिसत आहेत?

ट्विटरवर नेहमी सक्रिय असणारे आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान हे नेहमीच निसर्गाचा सुंदर आविष्कार जगापूढे आणत असतात. सध्या त्यांनी पोस्ट केलेला एक फोटो नेटकऱ्यांच्या डोळे आणि मेंदूच्या परीक्षा घेणारा ठरत आहे.

प्रवीण यांनी पोस्ट केलेल्या फोटोत झाडाच्या फांदीवर बसलेला एक बिबट्या स्पष्टपणे दिसत आहे. तिथेच अजून एका बिबट्याची शेपटी पण दिसते. पण तो दुसरा बिबट्या मात्र काय दिसत नाही. प्रवीण यांनी लोकांना तो दुसरा बिबट्या शोधायचे आव्हान दिले. 

शेपटी असूनही हा दुसरा बिबट्या नेमका कुठे आहे याचा मात्र शोध घेता येत नाही. कितीही शोध घेतला तरी हा बिबट्या मात्र सापडत नाही. सूक्ष्म निरीक्षण केल्या असता बिबटया दिसतो आणि कुठे या फोटोमागील कोडे सुटते. 

आम्ही हा दुसरा बिबटया कुठे आहे हे सांगणारच आहोत, पण आधी तुमच्या मेंदूचा पण थोडा व्यायाम होऊन जाऊद्या. फोटो निरीक्षण करून झाला असेल तर आम्ही सांगतो. त्या झाडाच्या बरोबर दोन खोडांमध्ये हा दुसरा बिबट्या डोके बाहेर काढत असताना दिसत आहे. खोडाचा आणि त्याचा रंग बऱ्यापैकी सारखा असल्याने तो लवकर सापडत नाही.

सोशल मिडीयावर मात्र लोकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. जर शेपटी नसती तर हा बिबट्या काय दिसला नसता अशीच बहुतांश लोकांची प्रतिक्रिया आहे. हा फोटो बघून मात्र जेवढे सोपे तेवढेच कठीण ही म्हण किती खरी आहे याचा अनुभव येतो.