दरवर्षी कित्येक वैज्ञानिकांना नासा अंतराळात पाठवत असते. या वैज्ञानिकांचा अवकाश दौरा हा अनेक महिन्याच्या असतो. काहीवेळा तर तो काही वर्षे देखील चालत असतो. या काळात त्यांच्या खाण्यापासून तर प्रसाधनापर्यंत गोष्टींची काय सोय केली जाते याबद्दल बऱ्याचवेळा चर्चा होते. यातच एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो ,तो म्हणजे एवढे दिवस आकाशात काढायचे म्हटल्यावर त्यांना किती कपडे घेऊन जावे लागत असतील? तिकडे त्यांच्या कपड्यांच्या स्वच्छतेचे काय केले जाते? हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? चला तर याच विषयावर काही माहिती जाणून घेऊया.
वैज्ञानिक आपल्या अंडरपंट्स आणि इतर कपडे खराब झाल्यावर फेकून देतात. आकाशात जमा होणारा कचरा याबद्दल तुम्ही ऐकले/ वाचले असेल. त्या कचऱ्यात कपड्यांचा पण समावेश होत असतो. आता यात बदल करण्यासाठी नासाने एक वेगळी डोक्यालिटी लढवली आहे.





