१९८२ साली भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारलं होते, "माणसाच्या शरीरात थायरॉईड कुठे असते?" त्यावेळी त्यांना याचे उत्तर आले नव्हते. पण २० वर्षानंतर ते जगातली सर्वात मोठी थायरॉईड टेस्टिंग कंपनी चालवत होते. ही प्रेरणादायक कथा आहे ए. वेलूमणी आणि त्यांच्या thyrocare या कंपनीची!!
वेलूमणींचा जन्म १९५९ साली तामिळनाडूमधल्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब कुटुंबात झाला. कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम होते. सरकारच्या मध्यान्ह भोजन (मिड-डे मील) योजनेमुळे त्यांना सरकारी शाळेत शिकता आले. हालाखीच्या परिस्थितीच त्यांनी १९७८ साली आपले बी. एस. सी.चे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीचा शोध सुरू केला. त्यांचा पदरी सगळी कडून निराशाच पडत होती, पण १९७९ मध्ये त्यांना एका औषाधाच्या कॅप्सूल बनविणाऱ्या कारखान्यात नोकरी मिळाली. पण पगार होता महिना १५०!!









