छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचं नांव घेताच सार्या मराठी बंधुभगिनींचा ऊर अभिनामानं भरून येतो. शिवराय अखेरपर्यंत शत्रूंशी लढत राहिले आणि कोणत्याच दुसर्या राजाचं मांडलिकत्व त्यांनी पत्करलं नाही. यात शिवरायांचा पराक्रम तर आहेच, परंतु त्यांना स्वराज्यस्थापनेची प्रेरणा देणार्या, त्यांच्या मनात स्वातंत्र्याची आस सतत जागृत ठेवणार्या आणि सतत खंबीरपणे पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊंचाही मराठी स्वराज्य संस्थापनेत मोठा वाटा होता.
आजच्या या पवित्र दिवशी पाहूयात जिजाऊंच्या जीवनातील काही क्षणचित्रे..



