हिरोच्या बाबाच्या माघारी बी. ए. फर्स्ट क्लासमध्ये पास होणार्या हिरोला वाढवण्यासाठी आपली सिनेमातली आई हमखास लोकांचे कपडे शिवून देण्याचं काम करते. गेलाबाजार घरात एखादी उषा किंवा सिंगरची शिवणमशीन असतेच. नाहीतर मग आसपास एखादा/एखादी वेळेवर आणि हवं तसं अल्ट्रेशन करून देणारी व्यक्ती शोधून ठेवावी लागते. मुलींचं तर या अल्ट्रेशनवाल्या लोकांवाचून बरंच अडतं.

सामान्य ज्ञान म्हणून वरती अडकवायचं दोर्याचं रीळ आणि आत कुठेतरी अडकवायची दोरा गुंडाळलेली बॉबीन या दोन्ही गोष्टी माहित असतात. पण मग नक्की शिवणाचं काम कसं केलं जातं हे मात्र कोडंच असतं. या वरच्या हलत्या चित्रात निरखून पाह्यलं असता बॉबीनमधला आणि वरच्या रीळातून खाली आलेला अशा दोन्ही दोर्यांचं एकत्रीकरण कसं होतं ते दिसून येईल. आहे की नाही गंमत!!
