व्हिडीओ ऑफ दि डे : धोनीने घेतलेली कॅच बघून तोंडात बोटे घालाल राव !!

व्हिडीओ ऑफ दि डे : धोनीने घेतलेली कॅच बघून तोंडात बोटे घालाल राव !!

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत विरुद्ध विंडीज वनडे मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. या सामन्यात धोनीने पुन्हा एकदा त्याच्या विजेच्या वेगाची चपळाई दाखवून दिली आहे राव. धोनीने जवळजवळ २० यार्ड उलट दिशेला धावत जाऊन डाईव्ह मारत चेंडू झेलला आहे. हा क्षण म्हणजे प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा होता.

चंद्रपॉल हेमराजने जसप्रीत बुमराहच्या शॉर्ट बॉलवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता पण हा शॉट नीट बसला नाही. त्याऐवजी चेंडू मागच्या बाजूने उडाला. अशा चेंडूचा झेल घेणं हे जवळजवळ अशक्य होतं. धोनीने मात्र त्याच्या सुपरफास्ट फिल्डिंगची पुन्हा एकदा कमाल दाखवून दिली आहे.

ज्यांनी ज्यांनी हा अफलातून प्रसंग मिस केला त्यांच्यासाठी आम्ही हा व्हिडीओ घेऊन आलो आहोत. चला तर धोनीचा वेगवान झेल बघून घ्या.

टॅग्स:

dhonicricketmarathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख