मंडळी, साधारणपणे कोंबड्याची मान छाटल्यावर कोंबडा मारतो, पण ७३ वर्षांपूर्वी एक असा कोंबडा होऊन गेला जो उरलेल्या शरीरासोबत १८ महिने जगला. ही whatsapp विद्यापीठातली भाकडकथा नाही राव. खरी गोष्ट आहे. चला तर आज या अजब कोंबड्याची कहाणी जाणून घेऊया.
१० सप्टेंबर १९४५ साली फ्रुटा, कोलॅराडो येथे लॉयड ऑल्सन आणि त्याची पत्नी क्लारा आपल्या शेतात कोंबड्या कपात होते. ऑल्सन एकेका कोंबडीची मान छाटत होता तर क्लारा त्यांना साफ करत होती. जवळजवळ ४० ते ५० कोंबड्या कापून झाल्यानंतर जेव्हा ते मांस घेऊन जायला उठले तेव्हा त्यातला एक कोंबडा डोकं छाटलेल्या अवस्थेत पळताना दिसला. दोघांनी मिळून कोंबड्याला सफरचंदाच्या पेटीत बंद केलं आणि ते निघून गेले.









