लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वानाच च्युईंगम तोंडात ठेवून ते चघळत राहायला आवडते. आज आम्ही या लेखातून या बबलगमबद्दल काही भन्नाट गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. गुलाबी रंगाचा हा छोटासा पदार्थ आजवर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. जगभर याचे चाहते आहेत. विशेष म्हणजे सर्वच वयोगटातील लोकांना याचे आकर्षण आहे. मात्र च्युईंगम आणि बबलगम यातील फरक अनेक लोकांना कळत नाही. दोन्हींतही एक मुलभूत फरक आहे, तो म्हणजे याचा गम बेस. च्युईंगमसाठी वापरला जाणारा बेस हा नैसर्गिक पद्धतीचा असतो. त्याला चिकल म्हटले जाते. तर बबल गमसाठी वापरला जाणारा बेस हा कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेला असतो. यासाठी स्टार्च आणि पॉलीमर्सचा वापर केला जातो. याव्यतिरिक्तही या बबलगम आणि च्युईंगमबद्दल आपल्याला सहसा माहित नसलेल्या गोष्टी पाहा..
१) दरवर्षी जगभर १,००,००० टन एवढा च्युईंगम चघळला जातो.
२) पूर्वी ग्रीक लोक तणावातून थोडासा विरंगुळा म्हणून रेझीनपासून बनवलेला गम चघळत असत.
३) बबलगम चघळल्याने मनावरील ताण हलका होतो आणि एकाग्रता वाढवण्यासही याचा उपयोग होतो असे म्हटले जाते.



