मॅकडोनाल्डमध्ये तुम्ही गेला असालच. तिथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे रोनॉल्ड मॅक्डोनाल्ड नावाच्या विदूषकाचा पुतळा. आपण मॅकडोनाल्डमध्ये जाऊन आलो हे जगाला सांगण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे या पुतळ्याच्या बाजूला बसून फोटो काढून घेणे. कित्येक वर्षे हा विदूषक लोकांचा लाडका होता. पण सध्या मॅक्डोनाल्डच्या शॉप्समध्ये हा विदूषक दिसत नाही. कारण कंपनीनेच ते पुतळे तिथून हलवले आहेत. यामागील कारण मात्र चांगलेच धक्कादायक आहे.
मॅकडोनाल्ड बर्गर दुकानाबाहेरचा विदूषकाचा पुतळा गायब झालाय? हे आहे त्याचे कारण....


२०१६ साली अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन राज्यातल्या पार्किंगमधल्या भयानक विदूषकांचे फोटो सोशल मीडियावर फिरत होते. हे फोटो एका दोन वर्षांनी रिलीज होणाऱ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वायरल करण्यात आले होते. पण यामुळे एक वेगळीच समस्या उभी राहिली. हे फोटो बघून लोक चांगलेच घाबरले होते.
या गोष्टीचा फायदा घेऊन काही आगाऊ लोकांनी तसे कपडे घालून लोकांना घाबरवण्यास सुरुवात केली. कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी हे विदूषक दिसून आले. हे लोक फॅन्सी स्टोअर्समधून कपडे घ्यायचे आणि लोकांना घाबरवायचे. यामुळे पोलिसांनी पण अशा लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या विदूषक नाट्याचा परिणाम हॅलोविनच्या वेळीही पण समोर आला. एवढेच नव्हे तर फ्लोरिडा येथे एका कुटुंबावर मास्क घातलेल्या विदूषकांनी हल्ला केला.

आता विदूषक या नावाभोवतीच सुरू असलेला हा राडा बघून मॅक्डोनाल्डने आपला विदूषकच काढून घेण्याचा निर्णय घेतला. मॅक्डोनाल्डने आपल्या वेबसाइटवर माहिती दिली होती की आम्हाला वाईट वाटत असले तरी रोनाल्ड मॅक्डोनाल्ड आता युके ॲडव्हर्टायजिंगचा भाग असणार नाही.
२०११ मध्ये ५५० डॉक्टरांनी वर्तमानपत्रांतून आवाहव करत प्रश्न केला होता की लहान मुलांसाठी घातक असलेल्या फास्ट फूडचा बोधचिन्ह म्हणून लहान मुलांचा आवडता विदूषकच कसा असू शकेल. कुठेतरी याचेही पडसाद उमटले आणि २०१६च्या या विदूषकाच्या वेषात लोकांना घाबरवले गेल्याच्या पार्श्वभूमीवर रोनाल्ड मॅकडोनाल्डला कायमचे हलवण्यात आले आहे. तो आता फक्त सोशल मिडिया आणि वेबसाईटवरच आपल्याला दिसेल,
उदय पाटील