लेबाननची राजधानी बेरुतमध्ये मंगळवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात खूप मोठे नुकसान झाल्याची बातमी आहे. स्फोट एवढा मोठा होता की सुरुवातीला अनेकांना भूकंप झाला की काय असे वाटले. जवळपास २०० किलोमीटरपर्यंत त्याचे पडसाद उमटले. न भूतो न भविष्यती असा हा स्फोट असल्याचे स्थानिक म्हणत आहेत.
मंगळवारच्या संध्याकाळी एका गोदामातल्या फटाक्यांना आग लागली. फटाक्यांचा दणादण आवाज व्हायला लागला आणि धुराच्या ज्वाळा शहरभर दिसायला लागल्या. हे बघण्यासाठी लोक बाहेर पडले तोच अजून एक जोराचा धमाका झाला. हा मात्र अतिप्रचंड होता. ज्वालामुखीसारख्या गोल आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.







