एखाद्या स्थळाला, तिथल्या माणसांना, तिथल्या संस्कृतीला अस्सलपणे टिपण्यासाठी ट्रॅव्हेल फोटोग्राफी हा उत्तम मार्ग आहे. सध्या सगळ्यांच्याच हातात मोबाईल आणि कॅमेरा आलेला असला तरी कोणीही उठून ट्रॅव्हेल फोटोग्राफर होऊ शकत नाही. त्यासाठी एक वेगळी दृष्टी लागते. आजूबाजूला एवढ्या गोष्टी घडत असतात की त्यातली नेमकी कोणती गोष्ट कॅमेऱ्यात कायमची बंदिस्त करायची हे कळण्यासाठी अनुभव लागतो. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे सध्या Anastasiya Dubrovina या बेलारूसच्या फोटोग्राफरने भारतभर फिरून टिपलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत.
आजच्या लेखातून आपण या गुणी फोटोग्राफरविषयी आणि तिने टिपलेल्या भारताची छोटीशी झलक पाहणार आहोत. चला तर सुरु करूया.





















