एकाच दिवसात ६ विमाने पाडणारा घोस्ट ऑफ कीव खरा की खोटा?? खरी बातमी जाणून घ्या!

एकाच दिवसात ६ विमाने पाडणारा घोस्ट ऑफ कीव खरा की खोटा?? खरी बातमी जाणून घ्या!

रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा भडका उडाला आणि युक्रेनचे आता काही खरे नाही असे सर्वांना वाटू लागले. युद्ध सुरू झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी मात्र एक व्हिडिओ वायरल झाला. हा व्हिडीओ बघून आणि त्यामागील माहिती वाचून युक्रेनियन विमानाने मोठा भीम पराक्रम केला असे सर्वांना वाटायला लागले होते.

युक्रेनच्या एका विमानाने रशियाची ६ विमाने एकाच दिवसात पाडल्याची वाऱ्यासारखी पसरली होती. हे विमान पाडणारा पायलट घोस्ट ऑफ कीव म्हणून प्रसिध्द झाला. त्याचे कौतुक देखील सुरू झाले. दुसऱ्या महायुध्दानंतर एकाच दिवसांत ६ विमाने पाडल्याची ही पहिलीच घटना असल्याने जगभर या विषयावर चर्चा सुरू झाली.

युक्रेन आणि जगभरातील युक्रेन समर्थकांनी या घोस्ट ऑफ कीवला हिरो म्हणून घोषित करून टाकले. इतकेच नाही, तर युक्रेनचे माजी राष्ट्रपती आणि इतर बड्या अधिकाऱ्यांनी या घोस्ट ऑफ कीव म्हणून प्रसिद्ध झालेल्या पायलटचे प्रचंड कौतुक केले होते.

या घटनेचा व्हिडिओ जगभरातील सर्वच प्रमुख माध्यमांनी प्रसिद्ध केला असल्याने या गोष्टीची जगभर हवा झाली. आता मात्र वेगळीच बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हा व्हिडिओच मुळात फेक आहे. हा व्हिडिओ एका वेगळ्याच गोष्टीसाठी तयार करण्यात आला होता.

 

आकाशातून एक विमान काही इतर विमाने पाडत आहे असा जो व्हिडिओ वायरल झाला तो कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आला होता. स्वित्झर्लंड येथील ईगल डायनॅमिक्स या कंपनीने तो व्हिडिओ तयार केला होता. याला डिसीएस वर्ल्ड असे म्हटले जाते.

फेक गोष्टी वायरल होण्याचे फायदे तोटे अनेकवेळा बोलले जात असतात. यावेळी मात्र युद्धासारख्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीदरम्यान एक फेक व्हिडिओ वायरल झाला आणि जगभर त्याची चर्चाही झाली. याचा परिणाम म्हणून युक्रेनचे मनोधैर्य उंचावले होते तर रशियाने याचा धसका घेतला होता.

आता ही गोष्ट फेक असल्याचे सिद्ध झाल्याने याचे काय परिणाम होतात तेही कळणार आहे.

उदय पाटील