कोविडच्या पाठोपाठ आलेलं नवीन संकट म्हणजे बेरोजगारी. गेल्या काही महिन्यांत लाखो लोकांनी नोकर्या गमावल्या आहेत. काहींच्या स्टँडबाय मोडवर आहेत. काहींची नोकरी शाबूत असली तरी मधल्या काळात पगार मिळालेला नाही किंवा कमी पगारावर काम करावं लागलंय. या सगळ्यांतून बाहेर पडण्यासाठी गूगलबाबा लोकांच्या मदतीला धावला आहे. नेहमीप्रमाणेच. गूगलमुळे आता नोकरी शोधणं शक्य झालं आहे. तेही फार धावपळ न करता... एका जागी बसून!
गूगलचं जॉब सर्च अॅप्लिकेशन आता भारतातही लाँच झालं आहे. या अॅपचं नाव आहे - कॉर्मो (Kormo). हे अॅप आपल्याकडच्या लाखो तरुणांना एंट्री लेव्हलच्या नोकर्या शोधण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, आणि जॉब मार्केटमध्ये आघाडीवर असलेल्या लिंक्डइनला त्याने आत्ताच टक्कर द्यायला सुरुवात केली आहे.







