व्हॉट्सॲप उघडत असताना तुमच्या मोबाईलवर पॉपअप मेसेज येत आहे? जर उत्तर हो असेल तर मंडळी तुमच्या मोबाईलवर 'एजेंट स्मिथ' नावाच्या एका मालवेअरने आक्रमण केले आहे. ज्यांना अजून तसे मेसेज आले नाहीत त्यांनी आनंदी व्हायचे कारण नाही राव!! कारण हा मालवेअरचा तडाखा लय जोरात बसत आहे. तो कधीही तुमच्या मोबाईलवर येऊन धडकू शकतो.
जगभरात तब्बल अडीच कोटी मोबाईल या वायरसने पीडित आहेत. त्यातले दीड कोटी फक्त भारतात आहेत. अमेरिकेत ३ लाख लोकांना या वायरसमुळे फटका बसला आहे. हा मालवेअर गेल्या काही दिवसातला सर्वात खतरनाक हल्ला मानला जात आहे. या मालवेअरला 'एजेंट स्मिथ' असे नाव देण्यात आले आहे.








