एकूण १८१ माणसे, ३९ बायका, ९४ मुले, १४ सुना, ३३ नातू आणि एक पणतू!! चक्कर आली ?
७० वर्षीय झीओना चाना नावाच्या गृहस्थाची ही फॅमिली आहे. मिझोरम मधल्या बट्वांग गावात १०० खोल्यांच्या घरात हे कुटुंब राहतं. ‘चाना’ या ख्रिस्ती पंथाचे झीओना हे प्रमुख आहेत. या समाजात बहुपत्नीत्वाला स्थान आहे. वयाच्या १७ वर्षी झीओना यांनी पहिले लग्न केलं होतं.
एवढ्या अवाढव्य कुटुंबाचं भरणपोषण करण्यासाठी अन्नही तेवढंच अवाढव्य लागतं. एका दिवसात १०० किलो तांदूळ, ६० किलो बटाटे, ३९ चिकन फस्त केलं जातं. झीओनांच्या सगळ्या ३९ बायका घर सांभाळणं तसेच शेतातील कामं करतात तर घरातील तरुण कारपेंटरचं काम करतात. झीओना यांच्या पहिल्या पत्नी घरातील सर्व हालचालींवर नजर ठेवून असतात. पूर्ण घराचं कामकाज एखाद्या मिलिटरी कँप प्रमाणे चालत असतं. एवढ मोठं कुटुंब असूनही सर्वजण मिळून मिसळून प्रेमानं राहतात हे ही एक नवलच आहे.
झीओना यांना एवढ्यावरच थांबायचं नाही, तर त्यांना पुढेही लग्न करण्याची इच्छा आहे. त्यासाठी ते मुलगी (बाई) शोधत आहेत. ते म्हणतात त्याप्रमाणे “३९ जणींचा पती असल्या बद्दल आणि जगातील सर्वात मोठ्या फॅमिलीचा कुटुंबप्रमुख असण्या बद्दल स्वतःला मी भाग्यवान समजतो”.
