इस्टोनीया -१९९१ पर्यंत या देशाचे नाव कुणाला माहिती नव्हते. कसे माहिती असणार? कारण तोपर्यंत हा देश तेव्हाच्या सोव्हिएत युनियनचा एक भाग होता. सोव्हिएत युनियनचे अनेक तुकडे झाले तेव्हा १९९१ साली या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९९१ साली बाह्य जगाशी संपर्क करण्यासाठी या देशात फक्त एक टेलिफोन, हो..फक्त एकच टेलिफोन लाईन होती आणि ती पण परराष्ट्र मंत्र्याच्या घरात! त्याच वेळी शेजारी देशाने म्हणजे फिनलंडने डिजिटल टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात केली. त्यांनी इस्टोनीयाला त्यांची जुनी ऍनालॉग टेलीफोन एक्स्चेंज फुकट देऊ केली. या देशाने नम्रपणे जुनी टेक्नोलॉजी नाकारून आपण पण डिजीटल यंत्रणाच वापरणार आहोत असे सांगितले..
.....आणि आज हा देश सगळ्या जगात डिजीटल तंत्रज्ञानाचा बाप म्हणून ओळखला जातो!! कशी केली ही थक्क करणारी प्रगती या देशाने? चला वाचू या इस्टोनीयाच्या डिजीटल क्रांतीबद्दल !!














