पावसाळ्यात लोखंडावर पटकन गंज चढतो. नेमकी बरेच दिवस वापरात नसलेली वस्तू बाहेर काढली की त्यावरचा गंज बघून कसंसंच होतं. म्हणून आम्ही आज घेऊन आलो आहोत एक सोपा उपाय, गंज घालवण्याचा!!
१. प्रथम साफ करण्याच्या वस्तूला व्हिनेगरमध्ये अर्धाएक तास भिजवून ठेवा. यामुळे बराचसा गंज वस्तूपासून वेगळा होईल. जुन्या टूथब्रशने तो वेगळा झालेला गंज घासून काढून टाका.
२. एक भाग बेकिंग सोडा आणि दोन भाग पाण्याचं मिश्रण तयार करून साफ करण्याची वस्तू या मिश्रणात पाच मिनिटं भिजवून ठेवा.
३. आता ही वस्तू एकदम साफ होऊन जाईल. त्यासाठी एकदा वस्तू पाण्याने धुऊन घेतली की झालं.
४. पुन्हा असा गंज चढू नये म्हणून लोखंडांच्या वस्तूंना एकदा खोबरेल तेलाचा हात पुसून कागदाने पुसून ठेवावे.
