कालचे महत्त्वाचे निकालः
गोल्फमध्ये पहिल्या फेरीत शिव चौरसिया २७ तर अनिर्बन ५०व्या स्थानावर आहे. अजून दोन फेर्या व्हायच्या आहेत. पण या क्रमांकावरून हे दोघेही अंतिम फेरीत जातीलसे वाटत नाही.
बॅडमिंटनच्या दोन्ही दुहेरी स्पर्धांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. अर्थात हे गट सामने असल्याने या दोन्ही संघांना आव्हान टिकवण्यासाठी पुढिल दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.
बॅडमिंटन एकेरी स्पर्धांमध्ये मात्र सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधु आणि श्रीकांत कदंबी या तिघांनीही आपापला पहिला सामना सरळ दोन सेट्समध्ये जिंकला.
तिरंदाजीमध्ये अपेक्षेप्रमाणे कोरीयन व तैपेयीच्या खेळाडूंसमोर दिपिका व बोम्बायला देवी टिकाव धरू शकल्या नाहित व त्यांच्या आव्हान संपुष्टात आले.
पुरुष बॉक्सिंगच्या ५६ किलो वजनी गटातही भारताचे अव्हान संपुष्टात आले.
पुरुष हॉकीमध्ये भारताला नेदरलँड्सच्या "नारंगी-आर्मी" ने २-१ तर महिला हॉकीत अमेरिकन टिमने ३-० असे नमवले. याच बरोबर महिला टिमचे आव्हान संपुष्टात आले आहे.
टेनिसमध्ये सानिया-बोपन्ना जोडीने सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. तिथे त्यांचा सामना अँण्डी मरे आणि वॅटसन या ब्रिटीश जोडगोळीसोबत होईल.
आज काय?:
ब्राझिलवेळेनुसार सकाळी, म्हणजे भारतात संध्याकाळपासून सातव्या दिवशीच्या खेळांना सुरूवात होईल.
