भारतीय क्रीडा क्षेत्र हळूहळू नव्या उंचीवर जाऊ पाहत आहे. ऑलिम्पिकमध्ये विविध खेळांत मिळवलेला विजय याचेच उदाहरण आहे. आता बास्केटबॉल संघाने पण हे सत्य आहे हे सिद्ध केले आहे.
दर चार वर्षांनी होणारे चषक हे प्रत्येक खेळात किती महत्त्वाचे असतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. फुटबॉलमध्ये फिफा, ऑलिम्पिक, क्रिकेट वर्ल्डकप तसेच बास्केटबॉल खेळासाठी FIBA आशिया कप खेळवला जात असतो.
२०२२ साली हा चषक इंडोनेशिया देशात खेळला जाणार आहे. आधी ही स्पर्धा याचवर्षी आयोजित करण्याचे नियोजन होते पण कोरोनामुळे ही स्पर्धा वर्षभर पुढे ढकलली गेली आहे. एकूण १६ देश या चषकासाठी भिडणार असतात. विशेष गोष्ट म्हणजे भारतीय बास्केटबॉल संघ चषकासाठी पात्र ठरला आहे. सलग दहाव्या वेळा भारत या चषकासाठी पात्र ठरला आहे.

