देशभरात लाखो दुकाने असतील, लाखो-करोडो रुपये खर्च करून बनविलेल्या दुकानांचे नसतील इतके या दुकानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. कारण तुम्हाला समजले असेल, हे आहे भारतातील शेवटचे दुकान!! इथून पुढे चीनची सीमा सुरू होते. म्हणून दुकानाचे नाव पण हिंदुस्थान की अंतिम दुकान असे आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हे दुकान आहे. २५ वर्षांपूर्वी इथे एकही दुकान नव्हते. मग चंदर सिंग बडवाल यांनी हे दुकान सुरू केले होते. ३११८ मीटर्सच्या उंचीवर हे दुकान असून चीनची सीमा या दुकानापासून अवघ्या काही अंतरावर आहे. हिमालयाच्या कुशीत चहा पिण्याचा मनसोक्त आनंद या इथे घेता येऊ शकतो.




