मुंबई विरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी सीएसके संघाला मोठा धक्का! संघातील दिग्गज खेळाडू या कारणामुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

मुंबई विरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी सीएसके संघाला मोठा धक्का! संघातील दिग्गज खेळाडू या कारणामुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील ३३ वा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये पार पडणार आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स (Mumbai indians) संघ आणि रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) संघ आमने सामने येणार आहे. या दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण मुंबई इंडियन्स संघाने ६ पैकी ६ सामने गमावले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला ६ पैकी केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ताफ्यात नव्या खेळाडूचा प्रवेश झाला आहे. न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज ॲडम मिल्ने (Adam Milne) दुखापतीमुळे आयपीएल २०२२ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाला संघात बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ॲडम मिल्ने दुखापतग्रस्त झाला होता. आता तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. 

ॲडम मिल्नेच्या जागी संघात स्थान मिळवलेला मथीशा पथिराना (Mateesha pathirana) मध्यमगती गोलंदाज आहे. त्याने २०२० आणि २०२२ मध्ये झालेल्या आयसीसी १९ वर्षाखालील स्पर्धेत श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला २० लाखांची बोली लावत चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात स्थान दिले आहे.

टॅग्स:

IPL

संबंधित लेख