ऐश्वर्याला आपली आई म्हणणारा हा तरुण नक्की आहे तरी कोण ?

ऐश्वर्याला आपली आई म्हणणारा हा तरुण नक्की आहे तरी कोण ?

ऐश्वर्याची प्रसिद्धी बघता तिला आपली बायको म्हणणारे अनेक दिसतील, पण आंध्रप्रदेशमध्ये एक तरुण आहे जो म्हणतोय की ऐश्वर्या ही माझी आई आहे!! या नवीन भानगडीला सुरुवात झालीय त्याच्या एका इंटरव्ह्यूपासून. पण ऐश्वर्याला आई म्हणणारा हा इसम आहे तरी कोण ? चला जाणून घेऊया.

संगीत कुमार असं या तरुणाचं नाव. तो २९ वर्षाचा असून विशाखापट्टणमचा राहणारा आहे. तो म्हणतो की १९८८ साली त्याचा जन्म लंडन येथे आयव्हीएफ तंत्राद्वारे झाला. त्याचा दावा आहे की त्याच्या जन्मानंतर २ वर्ष त्याचा सांभाळ खुद्द ऐश्वर्याच्या आई वडिलांनी केला. २ वर्षांनी आदिवेलू रेड्डी या त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या आईपासून दूर करत विशाखापट्टणमला आणलं. त्यानंतर तो रेड्डी यांच्या कुटुंबाबरोबर राहू लागला.

स्रोत

संगीतने दावा केला असला तरी त्याच्याकडे या बाबतचे काहीही पुरावे नाहीत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या नातेवाईकांनी हे पुरावे नष्ट केले. त्याला आईची म्हणजे ऐश्वर्याची फार आठवण येत असल्याचं तो सांगतो. त्याची इच्छा आहे की आईने त्याच्या सोबत येऊन राहावे. त्याच्या मते ऐश्वर्या सध्या अभिषेकबरोबर राहत नाहीय, त्यामुळं तिनं त्याच्यासोबत राहावे असंही तो म्हणत आहे.

असाच दावा अमर सिंग नावाच्या माणसाने देखील केला होता. आता संगीत नावाचा नवीन तरुण ऐश्वर्याला आई म्हणतोय. खरं काय आणि खोटं काय हे ऐश्वर्यालाच माहित राव...