....आणि मग चक्क लोकल मध्ये झालं लग्न !!

....आणि मग चक्क लोकल मध्ये झालं लग्न !!

कामानिमित्त मुंबई मध्ये येणारे आणि मुंबईतून बाहेर जाणारे, सगळ्यांचच आयुष्य लोकलशी जोडलेलं गेलं आहे. म्हणूनच रेल्वेला ‘लाईफ लाईन’ म्हटलं जातं. राव आपण गणपती पासून दसरा, दिवाळी सगळं लोकल मध्ये साजरी करतो. आता दिवाळी तर झाली मग पुढचा सण काय ?....अरे तुळशीचं लग्न हाय ना भाऊ !!  

विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या एका धावत्या लोकल मध्ये चक्क तुळशीचं लग्न लावून देण्यात आलं आहे. विरारच्या 'श्री साई स्वामी भजनी मंडळाने' लग्नाचा हा घाट घातला. आता लग्न म्हटलं की वऱ्हाड आले, सजावट आली, अंतरपाट, मंगलाष्टकं, अक्षता, वाजंत्री आले....राव हे सगळं इथे सुद्धा होतं. वऱ्हाड तर ‘इझिली’ मिळालं कारण लोकल मध्ये तशीही गर्दी होतीच, भजनी मंडळाच्या माणसांनी कंदील पताकांनी रेल्वेचा संपूर्ण डबा सजवला आणि मग काय मंगलाष्टक आणि फुलांच्या वर्षावाने लग्न पार पडलं.

अर्धा तास हे लग्न धावत्या ट्रेन मध्ये सुरु होतं. खरं तर मुंबईकर आणि लोकल रेल्वे याचं खूप आधीच लग्न झालं आहे राव. दोघांनाही एकमेकांशिवाय राहता येत नाही !!