चहा मध्ये खायचे बिस्कीट, डायट वर असताना खायचे बिस्कीट, डायबेटीस आहे म्हणून खायचं बिस्कीट, क्रीम बिस्कीट, चॉकलेट बिस्कीट, ऑरेंज बिस्कीट, खारे बिस्कीट, वगैरे वगैरे...मंडळी बिस्कीट म्हणजे दिवसाची सुरुवात करण्याचं एक मस्त आणि स्वस्त पर्याय.
आता तुम्ही म्हणाल या बिस्किटांना घेऊन काय नवीन सांगणार आहात भौ ? तर मंडळी नेहमी प्रमाणे एक “बोभाटा प्रश्न” आम्ही तुम्हाल विचारतो, “तुम्ही कधी विचार केला आहे का बिस्किटांमध्ये बारीक छिद्र का असतात ?”....काय ? आहे का उत्तर ? नाही ? मग चला जाणून घेऊया या छिद्रा मागील लॉजीक !!
साधारणपणे बिस्कीट भट्टीत किंवा मशीन मध्ये तयार केले जातात. बिस्किटांच्या आकारानुसार संपूर्णपणे भाजून तयार होण्यासाठी बिस्किटांना मुद्दाम छिद्र पाडली जातात. याला ‘बेकिंग होल्स’ म्हणतात. याचा फायदा म्हणजे अर्थातच बिस्कीट कुरकुरीत बनतात पण त्याच बरोबर एक मस्त डिझाईन देखील तयार होते. मंडळी हे छिद्र जर नसतील तर बिस्कीट नीट भाजले जाणार नाही, मग बिस्कीट खाताना मजा कशी येणार ?
मंडळी फक्त बिस्कीट नाही तर इतरही अनेक खाद्यपदार्थ ज्यांना तयार करण्यासाठी छिद्र पाडलेली असतात. जसे की “मेदू वडा”.
अरे भाऊ आता थँक यु वगैरे म्हणू नका हा. हे आमचं कामच हाय राव. कशाला लाजवताय !!
(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)
©बोभाटा

