एका बटाट्याच्या मोबदल्यात जे मिळाले ते बघून चक्कर येईल !!

एका बटाट्याच्या मोबदल्यात जे मिळाले ते बघून चक्कर येईल !!

इराणच्या शहाला बटाटा गिफ्ट केल्यानंतर बदल्यात जे मिळालं ते बघून चक्कर येईल भाऊ !!

इंग्रज जिथे जिथे गेले तिथून त्यांना नफा मिळवण्याचा हेतू तर होताच पण यामुळे जगभरात अनेक नव्या गोष्टी पोहोचल्या. यात आपल्या सर्वांचा फेवरेट बटाटा देखील होता जो आपण चवीने उपवासाला देखील खातो. हा बटाटा जसा इंग्रजांनी आपल्या देशात आणला तसाच तो इतर देशातही पोहोचवला.

तर मंडळी, हा बटाटा जेव्हा पर्शिया म्हणजेच आत्ताच्या इराण मध्ये पोहोचला तेव्हा काय झालं त्याचीच ही गोष्ट.


स्रोत

3१९ व्या शतकात इस्ट इंडिया कंपनीचे त्याकाळातील अधिकारी ‘सर जॉन मेलकॉम’ (१७६९-१८३३). यांनी इराणच्या शहाची भेट घेतली. त्यांचा हेतू म्हणजे ब्रिटीश कंपनीचा व्यापार वाढवणे आणि महत्वाचे म्हणजे भारताच्या वायव्य भागातील अफगाणांच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी मदत मागणे.

इंग्रजांची जुनी पद्धत मेलकॉम यांनी इथेही वापरली. पर्शियाच्या ‘फतेह अली शहा’ या बादशहासाठी त्याने भरपूर नजराणे नेले. या शहा ला नजराणे देणं आणि घेणं फार आवडायचं बरं का !! त्यांनी आपल्या नजराण्या बरोबरच एक साधी सिम्पल गोष्ट नेली. ती म्हणजे बटाटा. तो पर्यंत बटाटा हे पर्शिया मध्ये कोणी बघितलं देखील नव्हतं. 

शहाला बटाटा नजर केल्यानंतर ते शहाला एवढं आवडलं की त्याने मेलकॉम यांना हजारपट मोठा नजराणा दिला. या नजराण्यात होती पर्शियन बनावटीची एक सोन्याची रत्नजडीत थाळी. या थाळीवर पर्शियाचं प्रतिक म्हणून सिंह आणि सूर्य कोरले होते. थाळीवर सुंदर इराणी पद्धतीचं नक्षीकाम देखील केलं होतं.

याखेरीज आणखी एक नजराणा मिळाला. तो म्हणजे एक रत्नजडीत कट्यार. ही कट्यार म्हणजे शहाच्या स्वतःच्या कट्यारीची हुबेहूब नक्कल.

बटाटा मेलकॉम यांनी पहिल्यांदा आणल्यामुळे त्याला त्यांच्याच नावाने ओळखलं जाऊ लागलं. बटाट्याला लोक “मेलकॉमचं फळ” किंवा “पृथ्वीचं सफरचंद म्हणायचे”

या मेलकॉम साहेबांच भारताशी मोठा संबंध होता राव. त्यांचं अर्ध्याहून अधिक आयुष्य हे भारतातच गेलं. त्यानी भारतातील आपल्या आठवणींवर ‘अ मेमॉर ऑफ सेन्ट्रल इंडिया” हे पुस्तक लिहिलं.

तर मंडळी, आज जो बटाटा एकमेकांना लोक फेकून मारतात तो कशाप्रकारे जगभर पोहोचला त्याचं हे लहानसं उदाहरण.

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा