भारतात कार्समध्ये फेरबदल करून त्यांना विकणे बेकायदेशीर आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणावर जून्या आणि वापरात नसलेल्या गाड्या बदलून त्यांना दुसऱ्याच गाड्यांसारखे बनवून त्यांचा वापर सुरू असतो. मारुती ८००सध्या मार्केटबाहेर आहे. पण आजही ही गाडी जुगाड करून लोक इतर ब्रँडच्या गाडीसारखी बनवून फिरवत असतात. मध्यंतरी आसाममधल्या एका गॅरेजवाल्याने मारुती ८००पासून लॅंबोर्गीनी बनवल्याची गोष्ट आपण वाचली होती.
मॅग्नेटो ११ यांनी अशाच एका मारुती ८००ला लॅंबोर्गीनीसारख्या गाडीत बदलले आहे. त्यांनी ही गाडी कधीकाळी मारुती ८०० होती असे वाटणार देखील नाही अशा टू सीटर गाडीमध्ये बदलली आहे. त्यांनी अशाच एका मारुती ८००चे जिप्सीमध्येही रुपांतर केले आहे.

