सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा पोर्नोग्राफीक सिनेमे तयार केल्याच्या आरोपावरून अटकेत आहे. मुंबई पोलिस या पोर्नोग्राफीक सिनेमा प्रकरणाचा छडा लावत असताना त्याचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. दोन दिवसांपासून या विषयावर विविध माध्यमांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांची भन्नाट क्रियटीव्हिटी या विषयावर पण दिसत आहे. असा एखादा विषय फोकसमध्ये आला की लोक कितीही जुना संदर्भ शोधून काढू शकतात. याचा प्रत्यय सध्या भारताच्या आघाडीचा खेळाडू अजिंक्य रहाणेला येत आहे.





