एखाद्या घरी बाळ जन्माला आले म्हणजे घरातल्या लोकांचा गराडा नेहमी बाळाभोवती असतो. हे बाळ कधी बोलायला लागते, कधी चालायला लागते या प्रत्येक गोष्टीवर कुटुंबातील सदस्यांचे लक्ष असते. पहिल्यांदा आई म्हणतं की बाबा यावरून घरात प्रेमळ भांडणे होतात.
या लहान बाळांना आई बोल, बाबा बोल हे इतके बिंबवले जाते की त्यांचा पहिला शब्द तोच असतो. एवढेच नाही, तर बरीच बाळं पहिले काही दिवस फक्त आई-बाबा किंवा नुसतंच बा-बा-बा इतकंच बोलतात. पण एका बाळाने चांगलाच धमाका केला आहे. त्याचा पहिला शब्द ऐकून तुम्हाला पण धक्का बसेल.
एका ९ महिन्याच्या बाळाने पहिला शब्द उच्चारला तो म्हणजे "ऑलराईट बृह"? सामान्यत लोक आधी इंटरनेट आणि सोशल मिडिया वापरतात आणि मग तिथली भाषा म्हणजेच 'लिंगो' शिकतात, पण या बाळाने त्याआधीच 'ब्रो' कोड वापरायला सुरवात केली आहे.
इंटरनेटवर नव्याने वापरली जाणारी ही भाषा अवघ्या ९ वर्षांच्या मुलाला सुद्धा यायला लागली म्हणजे ही भाषा किती खोलवर रुजत आहे हे लक्षात येईल. खोटं वाटत असेल तर स्वतः व्हिडिओ बघून कंफर्म करता येईल. हे लहान बाळ मोठे होऊन चांगलेच कूल निघेल हे मात्र नक्की. अर्थात बाळाला काही या शब्दाचा अर्थ माहित असेल असं काहीच नाही, त्याने काहीतरी म्हटलं आणि ते अर्थपूर्ण निघालं हे तर सरळ आहे.
उदय पाटील
