व्हायरल व्हिडिओ : शास्त्रीय नृत्याला चिअर करणारा हा कुत्रा तुम्ही पाहिला का?

व्हायरल व्हिडिओ : शास्त्रीय नृत्याला चिअर करणारा हा कुत्रा तुम्ही पाहिला का?

अगदी पुरातन काळापासून कुत्रा हा प्राणी मानवाचा पक्का सोबती आहे. आपल्या मालकाप्रती असलेलं त्यांचं मुकं प्रेम आणि ईमानदारीचे दाखले प्रत्येक ठिकाणी पाहायला आणि ऐकायला मिळतात. सद्या असाच एक गोड व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. ज्यात एक पाळीव कुत्रा आपल्या मालकीणीच्या नृत्यासाठी तीला चिअर करताना दिसत आहे!

व्हिडिओ मध्ये दिसतं की एक मुलगी संगिताच्या तालावर शास्त्रीय नृत्य करत आहे आणि तीच्या शेजारी बांधलेला हा श्वानही आपले पुढचे दोन्ही पाय हवेत नाचवतोय. हे दृष्य पाहताना असं वाटतं की जणू तो आपल्या मालकिणीच्या नृत्याला एखाद्या चिअरलिडरप्रमाणं नाचून प्रोत्साहन देत आहे! मुक्या प्राण्यांमध्येही भावना असतात, याचा पुरावा देणारा हा सुंदर व्हिडिओ...  

फेसबुकवरती श्रीजीत त्रिक्कारा यांनी ही ३० सेकंदाची चित्रफीत शेअर केली आहे. आतापर्यंत ३ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी या उत्साही श्वानाचं कौतुक केलंय.