जागतिक स्तरावरील लोकप्रिय खेळाडूंची यादी काढायची म्हटली तर लियोनेल मेस्सी या अर्जेंटिनाच्या खेळाडूचे नाव टॉपवर असेल यात शंका नाही. फक्त फुटबॉल नाहीतर एकंदरीत सर्वच ठिकाणी त्याचे चाहते आहेत. मेस्सी हा फुटबॉल क्लब बार्सिलोना कडून खेळत असतो. बार्सिलोनाकडून खेळताना त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. बार्सिलोना कडून सर्वाधिक सामने, सर्वाधिक गोल्स, सर्वाधिक टायटल्स, सर्वाधिक विजय अशी अनेक विक्रमांची यादीच सांगता येईल.
मेस्सीचा बार्सिलोनासोबत असलेला अनेक वर्षांचा प्रवास संपुष्टात आला आहे. त्याने बार्सिलोना सोबत केलेला करार संपला असून आता तो दुसऱ्या कुणाही सोबत जाण्यासाठी मोकळा आहे. बार्सिलोना कोरोना आणि इतर कारणांनी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे त्यांची इच्छा असूनही मेस्सीसोबत नव्याने करार करणे तसे कठीणच आहे.





